घरकुल योजना.jpg
घरकुल योजना.jpg 
मराठवाडा

Good News : उमरग्यात दोन हजार कुटुंबाना मिळणार हक्काचे घर

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांचे रमाई आवास योजनेतून घर बांधकामाचे तब्बल दोन हजार ४५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. दरम्यान गेल्या पाच-सहा वर्षातील प्रस्ताव मंजूर झालेला हा सर्वात मोठा आकडा आहे.

रमाई आवास योजनेतून ग्रामीण भागात अनेक मागासवर्गीय लोकांना घरासाठी यापूर्वी अनुदान प्राप्त होऊन घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र बहुतांश लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रतिक्षा यादीत लटकले होते. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांनी सामाजिक न्याय व विकास सहाय्य विभागाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांचेही प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न होते.

त्याला यश प्राप्त झाले असून जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या दोन हजार ८३० प्रस्तावापैकी उमरगा तालुक्यासाठी दोन हजार ४५ घरकुलाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याचा लाभ मागासवर्गीय कुटुंबांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विकास सहाय्य विभागामार्फत एका घरकुलासाठी एक लाख वीस हजार अनुदान आहे.

अठरा हजारापर्यंतची रक्कम रोजगार हमी योजनेतून मिळते तर स्वच्छ भारत अभियानातून बारा हजाराचा निधी असे एकुण दीड लाख रुपये मिळतात. दरम्यान तीन कोटी ६७ लाख पन्नास हजाराचा निधी या कामासाठी मिळणार असून सातत्याने पाठपुरावा केल्याने घरकुलाचे सर्व प्रस्ताव मंजूर झाले असे सभापती श्री. पाटील यांनी सांगीतले.

संपादन-प्रताप अवचार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT